
वांगझोऊ: आशिया चषकाच्या(asian games) चौथ्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. २५ मीटर एअर पिस्तुल टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मनु भाकर, इशा सिंह आणि रिदम सांगवानच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. भारतासाठी बुधवारी शूटिंगमध्ये आलेले हे दुसरे पदक आहे.
भारताच्या खिशात आतापर्यंत ४ सुवर्णपदकांची कमाई झाली आहे. आता भारताचे शूटिंगमध्ये शानदार प्रदर्शन कायम राहिले तर पदकतालिकेत भारत टॉप ५मध्ये पोहोचेल.
दुसरीकडे भारताला ५० मीटर रायफल इव्हेंट प्रकारात सिल्व्हर मेडल मिळाले आहे. भारताने या इव्हेंटमध्ये दुसरे स्थान मिळवले. चीनने गोल्ड मेडल मिळाले आहे.