
बगदाद: उत्तर इराच्या नेवेह प्रतांतील अल हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी एका लग्नसोहळ्यात लागलेल्या भीषण आगीत(fire breakdown) तब्बल १०० लोकांचा मृ्त्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाले. नेवेह प्रांतातील मोसूल शहराच्या बाहेर राजधानी बगदादपासून ३३५ किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम ठिकाणी ही भयानक दुर्घटना घडली. इराकी वृत्त विभागाच्या माहितीनुसार आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये नवरा-नवरीचाही समावेश आहे.
दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक रिपोर्टनुसार फटाक्यांमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. इराकी वृत्त विभाग नीनाकडून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर स्थानिक पत्रकारांनी फोटोत इव्हेंट हॉलचे जळलेले अवशेष दिसत आहेत.
Fire at a wedding in Iraq kills at least 100, injures 150 #Wedding #celebration #fire #Hamdaniya #Nineveh #Iraq pic.twitter.com/envAsbbKnB
— Aditya (@rjadi28) September 27, 2023
लग्नाचा सोहळ्यात पसरली शोककळा
नीना वृत्त विभागाच्या रिपोर्टनुसार इराकच्या नागरी सुरक्षा निर्देशालयाच्या माहितीनुसार इमारतीमध्ये ज्वलनशील सामानामुळे आग भडकण्यास मदत मिळाली. अत्यंत ज्वलनशील पदार्थामुळे इमारतीत काही वेळातच आग भडकली.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग स्थानिक वेळेनुसार पावणे अकराच्या सुमारास आग लागली. त्यावेळेस शेकडोजण लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन करत होते.