Friday, June 20, 2025

Rajasthan Election: राजस्थानातही होणार भाजपचे MP मॉडेल? जयपूरमध्ये पोहोचले अमित शाह आणि जेपी नड्डा

Rajasthan Election: राजस्थानातही होणार भाजपचे MP मॉडेल? जयपूरमध्ये पोहोचले अमित शाह आणि जेपी नड्डा

जयपूर: मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानसाठी(rajasthan) भाजपची यादी लवकरच जाहीर होणार आहे. कोर ग्रुपच्या बैठकीनंतर पहिल्या यादीवर मोहोर लावली जाईल. मात्र यादी येण्याआधी अशी चर्चा आहे की राजस्थानातही भाजप मध्य प्रदेशचा फॉर्म्युला वापरू शकते. म्हणजेच केंद्रीय मंत्री तसेच खासदारांना तिकीट दिले जाऊ शकते.


कोर ग्रुपच्या बैठकीसाठी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा जयपूरला पोहोचले. बैठकीत बीएल संतोष, सीपी जोशी, वसुंधरा राजे, राजेंद्र राठोड, अर्जुन मेघवाल, कैलाश चौधरी, प्रल्हाद जोशी, अरूण सिंह, नितीन पटेल, कुलदीप बिश्नोई, विजया रहाटकर, राज्यवर्धन राठोड, सतीश पुनिया, नारायण पचेरियासह अन्य नेते उपस्थित होते.


सुरू असलेल्या चर्चेनुसार लोकसभा स्पीकर ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, केंद्रीय मंत्री कैलाश चौधरीशिवाय राज्यवर्धन सिंह राठोड, स्वामी सुमेधानंद सरस्वती आणि किरोडी लाल मीणाला भाजपचे उमेदवार बनवले जाऊ शकते.


याआधी मध्य प्रदेशात जेव्हा दुसरी यादी जाहीर करण्यात आली तेव्हा त्यात ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांचे नाव यादीत होते. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही उमेदवार बनवण्यात आले आहे.

Comments
Add Comment