Monday, October 27, 2025
Happy Diwali

IND vs AUS: तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६६ धावांनी विजय, भारताचा मालिका विजय

IND vs AUS: तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६६ धावांनी विजय, भारताचा मालिका विजय

राजकोट: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेचा शेवट गोड केला. याआधीच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा भारतासाठी औपचारिक होता.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर डेविड वॉर्नरने ५६ धावांची खेळी केली तर मिचेल मार्शने ९६ धावा फटकावल्या. त्यानंतर आलेला कर्णधार स्टीव्हन स्मिथने ७४ धावांची खेळी केली. तर मार्नस लांबुशग्ने यांने ७२ धावांची खेळी केली. यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावताना ३५२ धावा केल्या होत्या आणि भारताला ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते.

त्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात उतरले. भाराताच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या सामन्यात संधी देण्यात आली होती. त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. कर्णधार रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४८ धावा केल्या. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना चांगली धावसंख्या उभारता आली नाही.

रवींद्र जडेजाने ३५ धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाज साफ अयशस्वी ठरले. त्यामुळे भारताला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. भारताचा संपूर्ण डाव २८६ धावांवर आटोपला. यासोबतच भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >