Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीSalman Khan: सलमान खानला दर महिन्याला मिळणार तब्बल १ कोटी भाडे

Salman Khan: सलमान खानला दर महिन्याला मिळणार तब्बल १ कोटी भाडे

मुंबई : कोट्यवधी तरुणाईंच्या गळ्यातील ताईत असलेला सलमान खान(salman khan) अभिनयाशिवाय कोट्यवधींची कमाई करतो. ही कमाई त्याच्या भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीतून तसेच ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. दरम्यान नव्या अपडेटनुसार सलमान खानने एक कोटी रूपये महिना कमाईचा नवा रस्ता बनवला आहे.

अभिनेता सलमान खानने मुंबईच्या सांताक्रुझ येथील आपली कमर्शियल प्रॉपर्टी भाडेतत्वावर दिली आहे. सलमान खानने ही प्रॉपर्टी ऑगस्टपासून ६० महिने भाडेतत्वावर दिली आहे.

हा करार २ ऑगस्टला झाला

बॉलिवूड अभिनेत्या ही प्रॉपर्टी २,१४०.७१ स्क्वे मीटर इतकी पसरली आहे. त्यांनी ५.४ कोटी रुपयांची डिपॉझिट रकमेवर लँडक्राफ्ट रिटेल प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्वावर दिली आहे. येथे लोअर ग्राउंड, ग्राऊंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर सामील आहेत. प्रॉपस्टॅकनुसार दोघांमध्ये भाडे करार झाला असून या वर्षी २ ऑगस्टला झाला होता.

पहिल्या वर्षी ९० लाख रूपये होते भाडे

सलमान खानला पहिल्या वर्षी याच ठिकाणचे ९० लाख रूपये भाडे मिळणार. त्यानंतर दुसऱ्या वर्षी हे भाडे वाढून एक कोटी रूपये इतकी रक्कम होणार. यानंतर तिसऱ्या वर्षात हे भाडे वाढून एक कोटी रूपये होणार आहे. यानंतर तिसऱ्या वर्षात हे भाडे ५ लाख रूपयांनी वाढणार आहे. हे भाडे वाढून १.०५ कोटी रूपये होणार आहे. याचपद्धतीने चौथ्या आणि पाचव्या वर्षी अनुक्रमे १.१० कोटी रूपये आणि १.१५ कोटी रूपये महिना असणार आहे.

याआदी सलमान खानने प्रॉपर्टीला भाडे तत्वावर दिले होते. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, कार्तिक आर्यन आणि सारा अली खानसह अनेक अनेक बॉलिवूड कलाकारांनी अंधेरी पश्चिममध्ये वीरा देसाई रोडवर मुंबईच्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -