
नवी दिल्ली: अयोध्येत भगवान राम मंदिराचे(ram mandir) निर्मिती कार्य वेगात सुरू आहे. अशातच मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की तीन मजल्याच्या राम मंदिराच्या भूतलाची निर्मिती डिसेंबरच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल आणि प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला रंगेल.
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की १५ जानेवारी ते २४ जानेवारीला अनुष्ठान असेल. आमच्याकडून पीएमओला पत्र लिहिले आणि त्यावर उत्तरही आले. आता हे ठरले आहे की २२ तारखेला पंतप्रधान मोदी अयोध्येला जातील तर प्राणप्रतिष्ठा २२ तारखेला होईल. या कार्यक्रमासाठी आणखी लोकांनाही बोलावण्यात आले आहे.
असे असेल राम मंदिर
नृपेंद्र मिश्राने सांगितले की एक उपकरणावर डिझाइन करण्याचे काम सुरू आहे ज्याची स्थापना मंदिराच्या शिखरावर केली जाणार आहे. ज्यामुळे दर वर्षी राम नवमीच्या दिवशी गर्भगृहात देवतेच्या माथ्यावर सूर्य किरणे क्षणभरासाठी पडतील. हे बंगळुरूमध्ये बनवले जात आहे आणि त्याच्या डिझाईनची देखरेख वैज्ञानिक करत आहेत.
न्यायालयाने २०१९ मध्ये मंदिर निर्माणाला दाखवला होता हिरवा झेंडा
सर्वोच्च न्यायालयाने २०१९च्या निर्णयादरम्यान अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एका ट्रस्टद्वारे राम मंदिर निर्मितीचा मार्ग सुकर केला होता.