
नवी दिल्ली: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात तिसरा वनडे सामना बुधवारी रंगत आहे. राजकोटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याशिवाय सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल प्लेईंग ११चा हिस्सा असणार नाही.
या खेळाडूंशिवाय उतरणार टीम इंडिया
हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल मालिकेच्या पहिल्या २ वनडे भारतीय प्लेईंग ११चा हिस्सा नव्हता. मात्र असे मानले जात होते की राजकोट वनडे सामन्यासाठी हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल भारतीय प्लेईंग ११मध्ये पुनरागमन होऊ शकते.
हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर तिसऱ्या वनडेत भाग घेणार नाहीत. शुभमन गिलने इंदौरमध्ये शानदार शतक ठोकले होते. या सामन्यात शुभमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. त्यांनी आपल्य डावात ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते.
राजकोटमध्ये खेळवला जाणार तिसरा वनडे
हार्दिक पांड्याशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि अक्षऱ पटेलला प्लेईंग ११मध्ये नसणे टीम इंडियासाठी मोठा झटका मानला जात आहे. मात्र भारतीय टीमसाठी चांगली बाब म्हणजे ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.