Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023: पाकिस्तानी संघासाठी खुशखबर, वर्ल्डकपसाठी भारताने दिला व्हिसा

World Cup 2023: पाकिस्तानी संघासाठी खुशखबर, वर्ल्डकपसाठी भारताने दिला व्हिसा

मुंबई: वर्ल्डकप २०२३साठी(world cup 2023) पाकिस्तानी क्रिकेट संघ(pakistani cricket team) भारत दौऱ्यावर येत आहे. यासाठी बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाला खुशखबर मिळाली आहे. पाकिस्तानी संघाला भारत सरकारकडून व्हिसा मिळाला आहे. पाकिस्तानसोबत अफगाणिस्तान संघाला व्हिसा मिळाला आहे.

पाकिस्तानी संघाला वर्ल्डकपसाठी बुधवारी २७ सप्टेंबरला हैदराबादला पोहोचायचे आहे. आता भारतात येण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी आहेत. अशातच पाकिस्तानी संघासाठी ही चांगली बातमी आहे.

येत्या ५ ऑक्टोबरपासून क्रिकेट वर्ल्डकप २०२३ला सुरूवात होत आहे. पहिला सामना ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगत आहे. तर पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध ६ ऑक्टोबरला रंगत आहे.

भारताचे वर्ल्डकपमधील अभियान ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारताचा वर्ल्डकपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -