Wednesday, May 21, 2025

क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Asian Games: आशियाई गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी भारताची धमाकेदार सुरूवात, मिळाले पहिले सुवर्ण

Asian Games: आशियाई गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी भारताची धमाकेदार सुरूवात, मिळाले पहिले सुवर्ण

होंगझाऊ: चीनच्या होंगझाऊमध्ये खेळवल्या जात असलेल्या १९व्या आशियाई गेम्सचा(asian games) आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची भारताची सुरूवात जबरदस्त झाली. भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.


पुरुष १० मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील दिव्यांश पवार या त्रिकुटाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर भारताने रोईंगमध्येही कांस्यपदक पटकावले. रोईंगच्या मेन्स फोर स्पर्धेत जसविंदर, आशिष, पुनीत आणि आशीषने कांस्यपदक मिळवले.


१९व्या आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने पाच पदके मिळवली होती. पहिले पदक नेमबाजीत मिळाले होते. मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवले होते.


त्यानंतर रोईंगमध्ये भारताला दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळाले होते. त्यानंतर रमिता जिंदलने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतासाठी कांस्यपदक मिळवले होते.

Comments
Add Comment