Disease X : कोरोनानंतर आता आणखी एका महामारीचे संकट!

कोरोनाहून 'डिसीज एक्स' सात पटीने अधिक घातक


वॉशिंग्टन : कोरोना महामारी मधून अजून जग सावरू शकलेले नाही. त्यात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काळात अजून एक महामारी जगावर येऊ शकते. ज्यात तब्बल पाच कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. ही महामारी कोरोनापेक्षाही घातक असल्याचे म्हटले जात आहे.


जागतिक आरोग्य परिषदेने या येणाऱ्या महामारीचे नाव 'डिसीज एक्स' (Disease X) असे ठेवले आहे.


'डेली मेल'च्या एका रिपोर्टनुसार, कोविड-१९ ही एक सुरुवात आहे. येणाऱ्या महामारीत कमीत कमी पाच कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ब्रिटनमधील व्हॅक्सिन टास्कचे प्रमुख डेम केट बिंघम यांनी म्हटले आहे की, आपण नशीबवान आहोत की कोरोना घातक निघाला नाही. पण कोरोनाहून 'डिसीज एक्स' सात पटीने अधिक घातक होऊ शकतो. १९१८ आणि १९१९ साली आलेल्या फ्लूमुळे जगातील पाच कोटीहून अधिक नागरिकांचा जीव गमवावा लागला होता. येणारी महामारी ही त्यापेक्षा घातक असू शकते, असे ते म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या

ट्रम्प यांचा ८८ लाख रुपयांचा एच-१बी 'व्हिसा बॉम्ब' आजपासून लागू, जाणून घ्या कोणाला सूट मिळणार

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, H-1B

पाकिस्तानमध्ये ४.७ तीव्रतेचा भूकंप; अनेक घरांचे नुकसान

इस्लामाबाद: सोमवारी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार,

फिलीपिन्समध्ये फेंगशेन वादळ, १४,००० लोक बेघर; ७ जणांचा मृत्यू

मनिला : उत्तर आणि मध्य फिलिपिन्समध्ये आलेल्या उष्णकटिबंधीय वादळ ‘फेंगशेन’मुळे किमान ७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

भीषण अपघातात विमान धावपट्टीवरून थेट समुद्रात कोसळलं

मुंबई : अहमदाबाद विमान अपघातानंतर अलीकडे सतत विमान अपघातांची संख्या वाढलेली दिसते. हवाई प्रवास हा सुखकर,

पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र संग्रहालयात चोरी, घटनेनंतर संग्रहालय बंद

लंडन : पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये चोरीची घटना घडल्याने म्युझियम एक दिवसासाठी अचानक बंद करण्यात आले