नवी दिल्ली: मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३साठी(madhya pradesh assembly election) भाजपने आपली ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये पाच खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. यात तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. यात प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर आणि फग्गन सिंह कुलस्ते मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत.
भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणूक २०२३ ला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे. हे पहिल्यांदा घडत आहे जेव्हा केंद्रीय मंत्री खासदार आणि पक्षाचे मोठमोठे नेते विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरत आहे. या यादीत अर्धा डझनहून अधिक खासदार आणि मंत्र्याचा समावेश आहे.
केन्द्रीय चुनाव समिति ने मध्य प्रदेश में होने वाले आगामी विधानसभा चुनाव – 2023 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/qJT8nWXvLF
— BJP Madhya Pradesh (@BJP4MP) September 25, 2023