
नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो)(isro) ६ ऑक्टोबरपर्यंत चंद्र सूर्यास्तापर्यंत विक्रम लँड आणि प्रज्ञान रोव्हर यांना जागे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्य उगवल्यानंतर एक दिवसांनी शनिवारी अंतराळ संस्थ्येच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३(chandrayaan 3) मोहिमेच्या बोनस फेसला सुरू केले होते. इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की यावेळेस उपकरणांशी कधी संपर्क साधला जाईल याबाबत कोणतीही मर्यादा नाही.
आम्हाला नाही माहीत हे कधी जागे होतील. उद्या अथवा परवा अथवा लूनार डेच्या दिवशीही जागे होऊ शकतात. आम्ही प्रयत्न करत आहोत. जर लँडर आणि रोव्हर जागे झाले तर हे मोठे यश असेल.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार लँडर आणि रोव्हर एक लुनार डे आणि -२०० ते -२५० डिग्री सेल्सियसच्या कमी तापमानात वेळ घालवल्यानंतर ते निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र शास्त्रज्ञांना आशा आहे की जसे जसे लूनार डे पुढे जाईल आणि चंद्राच्या पृ्ष्ठभागावरील तापमान वाढेल याचे जागे होण्याची शक्यता वाढेल.
फक्त रोव्हरसाठी करण्यात आला प्रयोग
याआधी सोमनाथने सांगितले होते की रोव्हरचे परीक्षण कमी तापमानात जिवंत राहण्यासाठी करण्यात आले आहे. तर लँडर विक्रमसाठी असे करण्यात आलेले नाही. त्यांनी सांगितले होते की रोव्हरचे पूर्णपणे परीक्षण करण्यात आले आहे मात्र प्रज्ञान आणि विक्रम यांचे डिझाईन साधारण एकसारखेच आहे. याचा अर्थ जे परीक्षण प्रज्ञानसाठी उपयुक्त आहे तेच विक्रमसाठीही आहे.
बॅटरींना केले होते चार्ज
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार उपकरणे निष्क्रिय करण्याआधी बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यात आल्या होत्या. त्यातील सौर पॅनेल या पद्धतीने उन्मुख करण्यात आले होते की सूर्य उगवताच त्यांना प्रकाश मिळावा.
Nilesh Borate September 25, 2023 07:16 PM
No comments