Wednesday, July 3, 2024
Homeक्रीडाVideo: सूर्यकुमार यादवने ठोकले सलग ४ सिक्सर, ऑस्ट्रेलियाला दिवसाढवळ्या दाखवले तारे

Video: सूर्यकुमार यादवने ठोकले सलग ४ सिक्सर, ऑस्ट्रेलियाला दिवसाढवळ्या दाखवले तारे

इंदौर : भारतीय क्रिकेट संघाने(indian cricket team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपआधी खेळवल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत धमाल केली आहे. पहिल्या सामन्यात धमाकेदार विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरने शतक ठोकले. तर खालच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सूर्यकुमार यादवने(suryakumar yadav) एका ओव्हरमध्ये ४ षटकार ठोकत जोरदार पुनरागमन केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी वनडे वर्ल्डकपआधी भारतीय संघासाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव हे शेवटच्या सामन्यात पुनरागमन करतील. वर्ल्डकपआधी प्लेईंग इलेव्हनमध्ये आपली जागा पक्की करण्याच्या प्रयत्नात उतरलेल्या सूर्यकुमार यादवने दोन्ही सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली आहे.

 

सूर्यकुमारने ठोकले सलग ४ षटकार

पहिल्या सामन्यात अडचणीत सापडत असताना सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी धावून आला. त्याने कर्णधार राहुलसोबत मिळून डाव सांभाळला आणि संघाला विजयाच्या दारावर नेले. दुसऱ्या सामन्यातही त्याने फॉर्म कायम राखला. त्याने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज कॅमेरून ग्रीनच्या एका ओव्हरमध्ये सलग चार षटकार ठोकले. ४४व्या षटकांत आलेल्या या गोलंदाच्या पहिल्या चार बॉलवर सूर्यकुमार यादवने षटकार ठोकले आणि संपूर्ण ओव्हरमध्ये २६ धावा केल्या.

भारताचा धावांचा डोंगर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाने वनडे आंतरराष्ट्रीयमध्ये सगळ्यात मोठा स्कोर केला. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलच्या शतकानंतर सूर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ५ विकेट गमावताना ३९९ इतकी मोठी धावसंख्या उभारली. हा भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सगळ्यात मोठा वनडे स्कोर आहे. २०१३मध्ये बंगळुरू वनडेत टीम इंडियाने ३८३ धावा केल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -