IND vs AUS:शुभमन गिलचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त शतक, बनवला हा रेकॉर्ड

इंदौर: शुभमन गिलने(shubman gill) भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात इंदौर येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक ठोकले आहे. गिलने ९२ बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने या शतकादरम्यान ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

यात पहिल्या मोहालीमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेत गिलची बॅट जबरदस्त तळपली. त्याने ६३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली होती. दरम्यान त्यावेळी गिल शतकापासून वंचित राहिला होता. मात्र त्याने आपल्या वनडे करिअरमधील सहावे शतक ठोकले जे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे पहिले शतक होते.

गिलने ३५व्या वनडेत ३५व्या डावात त्याने सहावे शतक ठोकले. आतापर्यंत वनडेत गिल १९०० धावांचा आकडा पार केला आहे. गिल वनडेच्या ३५ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या शतकासह गिलने या वर्षी वनडेत १२०० धावांचा आकडा गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिलचे हे पहिले शतक आहे. याआधी खेळवण्यात आलेल्या आशिया चषक २०२३मध्ये बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. गिलच्या सहा वनडे शतकांमध्ये एका दुहेरी शतकाचा समावेश आहे.

आतापर्यंत असे राहिले गिलचे आंतरराष्ट्रीय करिअर


गिल भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये १८ कसोटी, ३५ वनडे आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या ३३ डावांमध्ये त्याने ३२.२च्या सरासरीने ९६६ धावा केल्या. यात त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत. वनडेत त्याने १९०० च्या धावांचा टप्पा पार केला आहे. याशिवाय टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये गिलने ११ डावांमध्ये ३०.४च्या सरासरीने आणि १४६.८६च्या स्ट्राईक रेटने ३०४ धावा केल्या आहेत. यात त्याने १ शतक आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. गिल भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा फलंदाज आहे.
Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात