Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘पॉवर ऑफ ॲटॉर्नी’

‘पॉवर ऑफ ॲटॉर्नी’

क्राइम: ॲड. रिया करंजकर

मधू, सीता व मीरा अशा तीन बहिणी व त्यांचा एकुलता एक भाऊ राजेश. मधू या अविवाहित होत्या, तर बाकीच्या दोन बहिणींची लग्न झालेली होती व त्या आपल्या सासरी नांदत होत्या. राजेश हा अनुकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला होता. त्याचाही सुशिक्षित रमाशी विवाह झालेला होता. राजेश आणि रमा यांना उमेश नावाचा मुलगा होता. काही काळानंतर राजेश आणि रमाचं पटत नव्हतं. त्याच्यामुळे रमा आपल्या मुलाला घेऊन राजेशपासून विभक्त राहत राजेश याच्याशी घटस्फोट घेतला नव्हता.

राजेश आपल्या डॉक्टरी पेशामध्ये मग्न होता आणि त्या पेशांमध्ये त्याने स्वतःला गुंतवून घेतलं होतं आणि यातच त्याला पॅरालिसिसचा अॅटॅक आला आणि तो पॅरालाइज झाला. त्याची सर्व जबाबदारी अविवाहित बहीण मधूवर आली, ती पेशाने नर्सच होती. तिच्या नावावर वडिलांचं घर होतं आणि तिथे दोघं बहीण-भाऊ राहत होते. माझं काय झालं तर भावाची देखभाल कशी होणार म्हणून तिने एका केअरटेकर माणसाची नेमणूक केलेली होती. श्याम असं त्याचं नाव होतं. तो चांगल्या प्रकारे राजेशची देखभाल करत होता आणि मधू त्याला त्याचे पेमेंट देत होती. आपल्यानंतर भावाची देखभाल करावी म्हणून आपल्या प्रॉपर्टीमधून काहीतरी त्याला द्यावे, असे तिने एकदा आपल्या बहिणींना बोलून दाखवलेलं होतं आणि मधूचे आजारात निधन झालं आणि राजेशची पूर्ण जबाबदारी ही बाकी दोन बहिणींवर आली. त्यावेळी त्यांनी श्यामलाच त्याची देखभाल करण्यासाठी सांगितले. कारण, बाकी दोन्ही बहिणींचेही आता वय झालेले होते. त्यांचे सर्व त्यांची मुलं बघत होते. मामाची जबाबदारी मुलं कशी घेतील? म्हणून श्यामलाच राजेशची जबाबदारी दिली. मधूच्या नावावर असलेले घर रिडेव्हलपमेंटसाठी गेलं आणि ते नावावर मधूच्या असल्याने व आता त्या जगात नसल्याने डेव्हलपर पेमेंट कोणाच्या नावाने करणार यासाठी ते पेमेंट डेव्हलपरकडे थांबलेलं होतं. मधूच्या बहिणी सीता आणि मीरा यांच्यामध्ये या प्रॉपर्टीवरून वाद आहेत याची जाणीव श्यामला होती व श्यामला हेही माहीत होतं की, जाताना मधूने मलाही हिस्सा द्यावा, असं सांगितलेलं होतं म्हणून काही घराचे पेपर त्याच्याकडे होते, तर काही हे मीराकडे होते. सीताच्या मुलांना नेमकं काय करावे, हे समजत नव्हतं.

एक दिवस श्याम याने पेपर बनवून सीता आणि मीराच्या मुलांना पाठवले व यावर सह्या करा. मला राजेश याच्या देखभालीसाठी खर्च करावा लागतोय तो मी कुठून करणार? मला पैशांची गरज आहे, असं त्याने सांगितलं. सीताच्या मोठ्या मुलाने मंदारने ते पेपर आपल्या जवळच्या वकिलाकडे चेक करण्यासाठी पाठवले असता. श्याम याने सीता, मीरा आणि राजेश यांच्या नावे रिलीज डीड बनवली होती. व गिफ्ट डीड या ठिकाणी दिल्या, असेही बनवलेलं होतं व या तिघाही भावंडाने ‘पॉवर ऑफ ॲटॉर्नी’ श्यामला दिली आहे, असे त्याने सगळे पेपर बनवून घेतले होते. वकिलांनी चेक केल्यावर मंदारला सांगितलं की, “तुमच्या मावशी आणि मामाने रिलीज डेट म्हणजे हक्क सोडपत्र आहे आणि ती सगळी जबाबदारी घराची या श्यामला दिलेली आहे, असं लिहून दिलेले आहे. त्याचप्रमाणे त्याला गिफ्ट डीड त्यांनी दिलेला आहे, अशा प्रकारचे पेपर आहेत.”

मंदारने याबाबतीत श्यामला विचारले असता, “मला पैशांची गरज आहे मामाला बघावं लागतंय त्याच्यासाठी खर्च येतोय” असं त्याने सांगितलं, तर मंदार याने सांगितलं की, “आम्ही तुम्हाला पैसे देतो किंवा आईच्या नावावर ते रूम झाल्यावर जे बिल्डरकडून पेमेंट येईल ते आम्ही तुम्हाला फिरवतो”, तर त्याने हे मान्य केलं नाही. मला अशा प्रकारे पैसे नकोत मला ती रूम विकण्याची पॉवर हवी. परत त्याने म्हणजे श्यामने पेपर बनवले व त्यामध्ये मीरा आणि राजेश यांच्याकडून रिलीज डीड व ही प्रॉपर्टी सीता म्हणजे मंदारच्या आईच्या नावाने करून म्हणजेच सीता हिच्या नावाने विल बनवून फक्त श्याम याने स्वतःचे नाव घातले. म्हणजे त्या विलमध्ये अधिकार श्यामला दिलेले आहेत, असं त्यांनी लिहिलं आणि पुन्हा एकदा सगळी पाॅवर आपल्याला दिलेली आहे, असं ‘पॉवर ऑफ ॲटॉर्नी’मधून लिहून घेतलं.

मंदार यांनी पुन्हा वकिलाचा सल्ला घेतला, तेव्हा वकिलांनी असं सांगितलं की, “रिलीज डीड आहे. तुझी मावशी आणि मामा यांनी हक्क सोडलेला आहे व मोठी बहीण म्हणजे सीता हिला दिले आहे. ती या घराचे व्यवहार बघू शकते; परंतु श्याम याने सीताच्या नावाचं विल तयार करून त्यामध्ये स्वतःला अधिकार दिले हे जे घातलेले आहे ते चुकीचं आहे, कारण सीता हिला तीन मुले आहेत आणि परक्या व्यक्तीला अधिकार कशी काय देतायेत. त्याचप्रमाणे त्या घराचे लीगल हेअर असताना ही परकी व्यक्ती मला रूम विकण्याचा अधिकार हवा आणि तो पण चौथा हिस्सा मावशीचा हवा, असं कसं काय सांगू शकतो? त्याला देखभालीसाठी पैसे नको, तर रूम विकण्याची पाॅवर हवी, असं तो म्हणतो हे चुकीचे आहे.” वकिलांनी त्यांना समजावून सांगितलं. वर तो श्याम मंदार यांना फोन करून धमकी देत असे की, “लवकरात लवकर करा, मला खर्च होतोय, मला परवडत नाहीये, असं तो त्यांना सांगू लागला, तर मामाला मला दुसरीकडे इतर कुठे हलवावे लागेल”, असंही तो त्यांना सांगू लागला.म्हणजे एका व्यक्तीला सांभाळण्याची जबाबदारी दिली आणि हा व्यक्ती सांभाळतोय म्हणून मधूने आपण याला काहीतरी देऊ, असं बहिणींना बोलली, तर त्याने आपल्याला या प्रॉपर्टीचा चौथा भाग मिळणार हा मोठा गैरसमज करून घेतला आणि काही पेपरवर नसताना तो त्या रूमचे लीगल हेअरमध्ये सीता रमा आणि राजेश यांच्या बरोबरीने हक्क मागू लागला. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची पॉवर नसताना तो जबरदस्तीने पॉवर मागू लागला.
(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -