Share

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ

दीर्घकाळ कॉलेजमध्ये ‘भौतिकशास्त्र’ हा विषय शिकवला. त्यात ग्रह (Planet), उपग्रह (Satellite), क्षेपणास्त्र किंवा अग्निबाण (Rocket) या विषयावरचाही धडा होता. विद्यार्थीसुद्धा खूप मन लावून लक्षपूर्वक याविषयी जाणून घ्यायचे. हा विषय मला शिकवताना आनंद व्हायचा आणि तो आनंद माझ्या विद्यार्थ्यांना शिकताना व्हायचा, जो त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसायचा! अनेक उपग्रह अवकाशात फिरू लागल्यावरही पाठ्यपुस्तकात मात्र ‘भास्कर’ आणि ‘आर्यभट्ट’ यांचाच कोणे एके काळच्या उपग्रहांचा उल्लेख बराच काळ होता; परंतु विद्यार्थ्यांना आपण रोजच्या व्यवहारातील उदाहरणे दिली तर ती त्यांना, तो विषय समजून घेण्यासाठी जास्त उपयोगी ठरतात आणि त्यांना विषय वास्तववादी वाटतो. विद्यार्थीही प्रश्न विचारतात. आपण विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देतात आणि पूर्णत्वाने समरस होतात. आता जी मी माहिती देणार आहे ती माहिती शिक्षण घेताना, वर्तमानपत्र वाचताना, एकमेकांशी गप्पा मारताना किंवा गुगल गुरूकडून आपल्याला नक्कीच मिळालेली आहेच त्यात थोडेफार काही अधिकचे मी सांगणार आहे.

उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज असते. ही गोष्ट साध्य करण्यासाठी एकापेक्षा अधिक अग्निबाण तयार केले जातात. त्यात अनेक अग्निबाण जोडून त्यांचा समूह केलेला असतो. पहिल्या टप्प्यावर अग्निबाणाचा पहिला मोठा भाग ठिणगी पडून त्याचा भडका उडतो आणि आकाशाच्या दिशेने उपग्रहाचे उड्डाण होते. आकाशात झेपावल्यानंतर ठरावीक कालावधीने आणि ठरावीक क्रमाने त्या अग्निबाणाचे पुढील टप्पे एका पाठोपाठ एक पेटत जातात. या अग्निबाणांची रचना अशी केलेली असते की, प्रत्येक टप्प्याच्या वेळी त्याच्या विशिष्ट टप्प्याचा भाग सुटा होतो आणि त्या निरुपयोगी झालेल्या भागाला मागे टाकून उरलेला उपग्रह पुढे जात राहतो. कोणताही अग्निबाण एकदा उडवल्यानंतर जळून नष्ट होतो. त्याचे अवशेष अवकाशात सोडून दिले जातात किंवा पृथ्वीच्या वातावरणात खाली येताना जळून जातात. अग्निबाणात पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. उपग्रहाच्या आकारानुसार निरनिराळ्या प्रकारचे अग्निबाण तयार केले जातात.

आता लक्षात घ्या की, जसजसे अग्निबाण नेमकेपणाने कशासाठी वापरले जातात, तर पृथ्वी या ग्रहावरून उपग्रह वरच्या दिशेला उडण्यासाठी मग त्याची दिशा बदलण्यासाठी आणि मग परत त्या उपग्रहाला दुसऱ्या ग्रहावर उतरवण्यासाठी. म्हणजे उपग्रहाला लावलेले अग्निबाण कमी कमी होत जातात. आता आपल्या लक्षात आले असेल की ‘अग्निबाण’ नेमके काय करतात! या अग्निबाणाच्या जोरावर उपग्रह अवकाशात झेपावते. त्याला दिलेली कार्य करतो. आता जेव्हा भौतिकशास्त्र सोडून मी या सगळ्या घटकांकडे पाहते तेव्हा वेगळेपणाने माझ्या काही गोष्टी लक्षात येतात.

आपल्या आयुष्यातसुद्धा अनेक जण अग्निबाण झालेले आहेत. कोणी तुम्हाला जन्म दिला असतो. पहिले पाऊल टाकायला शिकवलेले असते. कला-क्रीडा क्षेत्रांतील प्रगतीत मदत केलेली असते. शिक्षणाबरोबर माणुसकीचे धडे दिलेले असतात. यापैकी किती गोष्टी आपण लक्षात ठेवतो? त्यांना आपल्यासाठी हे सगळं करताना किती शक्ती लागली असेल? किती पैसा लागला असेल? किती वेळ त्यांनी दिला असेल? कधी कधी तर ते स्वतःही संपुष्टात आले असतील पण त्यांनी आपल्याला सर्वार्थाने मोठे केलेले असते, अशी आपल्या आयुष्यात आलेली माणसे, त्या सर्वांना या लेखाच्या निमित्ताने फक्त आठवून बघा. नुकतेच ‘चंद्रयान’ या मोहिमेत उपग्रह (चंद्रयान) सोडण्यात आले… तेव्हा पृथ्वी या ग्रहावर त्याचा व्यास किती मोठा होता, हे आपण पाहिलेच. त्याला अनेक अग्निबाण जोडले गेलेले होते. हळूहळू यानातील एक एक भाग तो खाली सोडत सोडत हलका होत चंद्रावर उतरला. चंद्रावर उतरणारा हा उपग्रह आपण पाहिलात. जे उपग्रह येथून निघाले होते आणि जे चंद्रावर उतरले त्यात केवढा फरक होता. वजनाचा फरक होता आकारमानात फरक होता. माणसानेही अशा तऱ्हेने आपल्या डोक्यावरील, खांद्यावरील, मनावरील ओझी फेकून दिली तर आपल्या जीवनालाही एक गती मिळेल आणि आपण प्रगती करू शकू!

म्हणजे नेमके काय करायचे? घरातले जुने कपडे, जुनी भांडी, जुने फर्निचर, बऱ्याच काळापर्यंत न वापरलेल्या अनेक वस्तू ज्या आपल्यालाही माहीत आहेत की आपल्याला यापुढेही कधी लागणार नाहीत ते त्याची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणे. अशा तऱ्हेने घर रिकामे झाले तरी कोणाचे तरी मन आपल्या या कृतीने भरून जाणार आहे! ज्यांच्याशी फार पूर्वीपासून आपला वाद होता त्याच्याशी संवाद करून बघा! कदाचित त्याच्या मनातही तेच असेल आणि तो तुमच्यापेक्षा जास्त उत्साहाने संवादात भाग घेईल. झालेला वाद विसरून जाईल! एक नव मैत्र निर्माण होईल. मनावरचा भार कमी करण्यासाठी आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्या व्यक्ती जिवंत असतील तर त्यांना भेटून, फोन करून आभार माना आणि जे स्वर्गात पोहोचले आहेत त्यांची आठवण करून आभार माना. जितकी ओझी कमी कराल, तितके हलके वाटेल. प्रगतीची गती वाढेल, दिशा उंचावेल… हे निश्चितच!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Shah Rukh Khan Wife Troll : शाहरूख खानच्या पत्नीच्या कपड्यांना बघून भडकले चाहते

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…

1 hour ago

Gaurav More: ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; ही महागडी गाडी घेतली

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…

1 hour ago

Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…

2 hours ago

आईस्क्रीम कारखान्यातील धक्कादायक घटना, कामगारांना दिली अशी वागणूक की प्राणीही घाबरावेत !

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…

2 hours ago

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

4 hours ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

4 hours ago