Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023: आशियाई गेम्समध्ये भारताने खाते खोलले, आधी नेमबाजीत नंतर रोईंगमध्ये...

Asian Games 2023: आशियाई गेम्समध्ये भारताने खाते खोलले, आधी नेमबाजीत नंतर रोईंगमध्ये रौप्य पदक

होंगझाऊ: आशियाई गेम्स २०२३ची(asian games) २३ सप्टेंबरला सुरूवात झाल्यानंतर आज भारताने पदक जिंकण्यास सुरूवात केली आहे. नेमबाजीत भारताच्या महिला संघाने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले तर रोईंगमध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंहने पुरुष लाईटवेट डबल्स स्कल्सच्या फायनलमध्ये दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक पटकावले.

भारताच्या महिला नेमबाजी टीमने १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये १८८६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. या इव्हेंटमध्ये भारताकडून रामिता, मेहुली घोष आणि अशी चौकसीने भाग घेतला होता. तर चीनच्या टीमने १८९६.६च्या स्कोरसह संपवत सुवर्णपदक पटकावले. या इव्हेंटमध्ये तिसऱ्या स्थानावर मंगोलियाची टीम राहिली. त्यांचे १८८० अंक होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -