आयसीसीकडून वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार ३३ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत एकट्याने या भव्य स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा भारतामध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान, होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांसाठी बक्षिसांची रक्कम जाहीर केली. यात आयसीसीकडून अंदाजे ८३ कोटी रुपये बक्षिसांसाठी रक्कम वितरीत करेल.


यापैकी, विजेत्याला रु. ३३ कोटी तर उपविजेत्याला १७ कोटी मिळतील. याचा अर्थ विजेत्या संघासोबत अतिम फेरीत हरणा-या संघाला देखील मोठे बक्षीस मिळणार आहे.


उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला सुमारे ६ कोटी रुपये आणि गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला सुमारे ८२ लाख रुपये मिळतील. यावेळी जाहीर करण्यात आलेली बक्षीस रक्कम गेल्या हंगामाप्रमाणेच आहे.


परिषदेने पूर्वीच्या सुमारे ८३ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या मोसमातील चॅम्पियन इंग्लंडला सुमारे ३३ कोटी रुपये मानधन मिळाले होते.



टी-२० विश्वचषक विजेत्याला १३ कोटी रुपये


गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक जिंकणा-या इंग्लंड संघाला १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला ६ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपये मिळाले होते.


एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४६ दिवस चालेल, ज्यामध्ये ४८ सामने खेळले जातील. पहिला सामना हा ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना मागील विश्वचषक विजेते आणि उपविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.



१४ तारखेला भारत-पाकिस्तान सामना


टीम इंडियाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस