रवींद्र तांबे
प्रत्येक ऋतूचा अभ्यास केल्यास त्या त्या ऋतूमध्ये वातावरण बदलाचा परिणाम आपणा सर्वांना जाणवतो. आज सर्वांना नक्कीच वाटेल की, वातावरणात प्रचंड बदल पाहू शकतो. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे कधी एकदा पाऊस पडतो असे प्रत्येकाला वाटत असते. जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने. यावेळी वरुणराजाचे उशिरा आगमन झाले तरी सध्या अधूनमधून पाऊस लागत आहे. त्यात कडक उन्हाचे सुद्धा चटके सहन करावे लागतात. त्यामुळे दमट व उष्ण वातावरणाला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जुलै महिन्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यात इतका गारवा निर्माण झाला की, रात्री चादर घेऊन झोपणारी मंडळी ब्लँकेट घेऊ लागली. तर संध्याकाळच्या वेळेला गरम स्वेटर अंगात घालू लागले. या बदलामुळे लोक अचानक आजारी पडू लागले. त्यात काहींचे डोके जड होऊ लागले. सर्दी, खोकला आणि अधून मधून ताप येऊ लागला. असे वातावरण आरोग्याला अपायकारक असते. पावसाळ्यात बऱ्याच वेळा निसर्गामध्ये वेगाने बदल होत असतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. सध्या बऱ्याच ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. तेव्हा आरोग्य खात्याने सुद्धा अधिक दक्ष राहाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कारण हवामानात बदल झाल्याने रोगराई वाढू शकते. मात्र त्यावर वेळीच उपाय करायला हवेत म्हणजे त्याचा प्रसार होत नाही. त्यासाठी स्वच्छता जास्त महत्त्वाची असते.
सध्या वातावरणाची स्थिती कशी आहे, याची सर्वांना कल्पना आहे. हा जो बदल होतो तो नैसर्गिक असतो. कधी पोषक तर कधी नैसर्गिक संकटांचा नागरिकांना सामना करावा लागतो. कधी उष्ण तर कधी थंड वातावरण असेल तर वयोवृद्ध तसेच दम्याचा आजार असणाऱ्या व्यक्तीला फार त्रास होतो. अशावेळी योग्य ती काळजी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे कधी गरम पाणी तर कधी थंड पाणी यामुळे सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. अशावेळी आपण राहात असलेल्या घराची व परिसराची साफसफाई अतिशय महत्त्वाची असते. आपल्या घराची सुद्धा नियमित साफसफाई करायला हवी. त्याचप्रमाणे घराच्या आजूबाजूची सुद्धा नियमित सफाई होणे गरजेचे असते. बरेचजण सुट्टीच्या दिवशी घरी असल्यावर ते स्वत: घराची तसेच परिसराची साफसफाई करतात. घरातील शाळकरी मुलांनी सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे किंवा आपल्या परिसरात साफसफाई करीत असतील तर त्यांना मदत केली पाहिजे. तेव्हा सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये घर तसेच आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर साफ ठेवणे निश्चितच आपल्या, कुटुंबाच्या व शेजाऱ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरेल.
आता १ ऑक्टोबरपासून हिवाळा ऋतू सुरू होईल. त्यात ऑक्टोबर हिटचा नागरिकांना सामना करावा लागेल. त्यात कधी पाऊस, तर कधी गारवा यामुळे वातावरण आरोग्याला पोषक नसते. याचा परिणाम कधीही आरोग्य बिघडू शकते. त्यासाठी योग्यवेळी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. वातावरण बदल आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यावर आरोग्य खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिबिरे आयोजित करण्यात यावीत. आपली तसेच आपल्या कुटुंबीयांची काळजी कशी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक नागरिकांना करून दाखवावे. आपल्या कुटुंबातील कोण आजारी पडला तर प्रथमोपचार कसा करावा, याची रंगीत तालीम करून सुद्धा दाखवावी. त्यांच्यामध्ये वातावरण बदलाची जाणीव-जागृती करावी. महत्त्वाची बाब म्हणजे ते अंधश्रद्धेच्या आहारी जाणार नाहीत, याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. सध्या कोणत्याही ऋतूमध्ये काहीही होऊ शकते. तेव्हा त्याप्रमाणे नागरिकांना जागृत केले पाहिजे. तसेच त्याची काळजीसुद्धा घेता यायला हवी. आज बऱ्याच आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर नसल्याचे दिसते. त्यामुळे गरीब, होतकरू लोकांना खासगी दवाखान्यात जावे लागते. यात आर्थिक भुर्दंड त्यांना बसतो. काही वेळा सर्पदंश झाल्याने आरोग्य केंद्रात घेऊन जातात मात्र त्या ठिकाणी ग्रामपंचायतमधून इंजेक्शन घेऊन या, असे सांगितले जाते. यात बराच वेळ जावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. तेव्हा प्रत्येक आरोग्य केंद्रात अशी इंजेक्शन असायला हवीत. इंजेक्शन संपली असतील तर त्वरित आणून त्याचा साठा आपल्या आरोग्य केंद्रात ठेवावा.
वातावरणातील बदलामुळे आरोग्याची काळजी घेत असताना आपण घराबाहेर कामानिमित्त गेल्यास परत घरी आल्यावर हात व पाय स्वच्छ धुवून त्यानंतर टॉवेलने पुसून घरामध्ये प्रवेश करावा. आपले टॉवेल दुसऱ्याला देऊ नये. घरात बसून गरम पाणी प्यावे. तसेच गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. शक्यतो बाहेरचे पदार्थ खावू नयेत. खोकला आल्यास तोंडावर रुमाल धरावा. दुसऱ्याचा रूमाल शक्य तो वापरू नये आणि वेळच्या वेळी हात धुतले पाहिजेत. वातावरण बदलामुळे आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी आपणा सर्वांना घ्यावी लागेल.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…