IND vs AUS: मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास

मोहाली: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा गोलंदाजी करताना कांगारूंना २७६ धावांवर रोखले. आशिया चषकातील सामन्यांमध्ये प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलेल्या अनुभवी मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त खेळ केला आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकत गोलंदाजी निवडली. मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवताना संघाला शानदार सुरूवात करून दिली. भारताचे गोलंदाज पाहुण्या संघावर तुटून पडले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांवर आटोपला.


१९ महिन्यानंतर एकदिवसीय सामना खेळत असलेल्या आर अश्विननेही एक विकेट मिळवला. जसप्रीत बुमराहआणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या नावे केला. खरा जलवा तर शमीने दाखवला त्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला.


आशिया चषकादरम्यान मोहम्मद शमीला कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांनी प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. जसप्रीत बुमराह खासगी कारणामुळे श्रीलंकेवरून भारतात परतला तेव्हा त्याची जागा शमीला देण्यात आली. मात्र जसे बुमराह परतला तसे शमीला बाहेर करण्यात आले. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १० ओव्हरमध्ये ५१ धावा देत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट मिळवल्या.


यासोबतच त्याने नवा इतिहास रचला. भारतात खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ५ विकेट घेणारा शमी पहिला भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. याआधी कोणत्याही भारतीयाला ही कामगिरी करता आलेली नाही.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे