Monday, July 8, 2024
Homeक्रीडाIND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

IND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

मोहाली: वर्ल्डकपच्या आधी सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट राखत विजय मिळवला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले.

भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलचा हा निर्णय मोहम्मद शमीने योग्य ठरवला. शमीने या सामन्यात ५ विकेट घेत इतिहास रचला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५२ धावा केल्या तर जोश इग्निसने ४५ धावांची खेळी केली.

त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. भारताची सुरूवात दमदार झाली. भारताच्या सलामीवीरांनी अर्धशतक ठोकत भारताच्या विजयाचा पाया मजबूत रचला. ऋतुराज गायकवाडने ७१ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरला फक्त ३ धावांची खेळी केली. अय्यर झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने आपल्या हाती कमान घेतली. लोकेश राहुलने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ दिली.

सूर्यकुमार यादव ५० धावा करून बाद झाला. इशान किशनही या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो १८ धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला माघारी धाडले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -