मुंबई : मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम भागातील ओशिवरा येथील हीरा पन्ना शॉपिंग मॉलमध्ये आज दुपारी भीषण आग लागली आहे.
आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसून बचावकार्य सुरू असल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, ‘दाट धूर निघत असून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिका वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.