मुंबई : देशासह राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshostav 2023) धामधूम सुरू असताना मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणा-या लालबागच्या राजाच्या मंडपात (Lalbaugcha Raja) तुफान गर्दी झाली आहे. अशातच गर्दी अनियंत्रित झाल्याने दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिका-यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी देशासह राज्यभरातून भाविक येत असतात. अभूतपूर्व गर्दी होत असल्याने सुरक्षेसाठी पोलीस आणि कार्यकर्ते तैनात असतात. पण गर्दीचा रेटा प्रचंड असल्यामुळे गर्दी नियंत्रित करणे केवळ अशक्य होते.
लालबागच्या राजाच्या मंडपात तुफान गर्दी झाली आहे. अशातच गर्दी अनियंत्रित झाल्याने दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिका-यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. pic.twitter.com/zZ0rbBuSeI
— PrahaarNews Live (@PrahaarNewsLive) September 22, 2023
लालबागच्या राजाच्या मंडळात असे प्रकार दरवर्षी घडतात. कधी पदाधिकारी आणि पोलिसांमधील हाणामारी, तर कधी पोलिसांकडून पत्रकारांवर करण्यात आलेली अरेवारी, तर कधी भाविकांना झालेली धक्काबुक्की… यांसारखे प्रकार अनेकदा घडतात आणि त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात.