Sunday, April 20, 2025
Homeगणेशोत्सव'आली गवर आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’

‘आली गवर आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’

गौरी पूजनाला संततधार पावसाचे आगमान

गौरी पूजनाच्या दिवशीच दुपारपासून पावसाच्या जोरदार सरीवर सरी बरसू लागल्याने महिलांची धावपळ उडाली. गेल्या तीनचार दिवसांपासून गौरी- गणपतींच्या सणाला दुपारी व सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पडणे देखील अवघड बनले आहे. बुधवारी रात्री तर विजेच्या गडगडाटासह या परिसरात मुसळधार पाऊस पडला. तालुक्यात आतापर्यंत २२८२ मिमी पाऊस पडल्याची माहीती मुरूड तहसील सूत्रांनी दिली.

नव्याने विवाहबध्द झालेल्या माहेरवाशीणी गौरीच्या ओवशांसाठी माहेरी आल्या आहेत. त्यांना नटुनथटून बाहेर पडणे पावसाने मुष्किल झाले. मुरूड परिसरात वाहनांची गर्दी झाली असून, बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे पावसामुळे सर्वच परिस्थिती अवघड बनली आहे.

हवामान खात्याने दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नातेवाईकांकडे गौरी- गणपती दर्शनाला जायचे कसे अस प्रश्न गणेश भक्तांना पडला आहे.मुरूड तालुक्यात सुमारे सात हजारावर घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -