IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहलीला का दिला आराम, समोर आले कारण

मुंबई: वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि विराट कोहलीला(virat kohli) आराम देण्याच्या निर्णयावरून सवाल उपस्थित केले जात आहेत. वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रशिक्षक राहुल द्रविडने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल द्रविडचे म्हणणे आहे की वर्ल्डकप पाहता विराट कोहली आणि रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे.


विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलयाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात संघाचा भाग असणार नाहीत. दरम्यान, तिसऱ्या वनडेसाठी हे दोघेही संघात परतणार आहेत. राहुल द्रविड म्हणाला, आराम देण्याचा निर्णय खेळाडूंशी बोलूनच घेतला आहे. वर्ल्डकपच्या आधी हे दोन्ही खेळाडू शारिरीक आणि मानसिकरित्या फिट असणे संघासाठी महत्त्वाचे आहे.


याआधीही गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेतही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये आराम देण्यात आला. आशिया चषकात जरी कर्णधार रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये प्लेईंग ११चा भाग होता. मात्र विराट कोहलीला फायनलआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता.



विराट आणि रोहितवरून केले सवाल


वर्ल्डकपआधी या दोन्ही खेळाडूंना कमी वनडे सामने खेळायला देणे यावरून सवाल उपस्थित केले जात होते. विराट कोहली जगातील सर्वात फिट क्रिकेटर मानला जातो. असे असतानाही इतक्या सामन्यात विराटला आराम देणे हे समजण्याच्या पलीकडे आहे. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकदाही मोदानात उतरलेले नाहीत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये या दोन्ही खेळाडूंना पुन्हा संधी मिळणार की नाही यावरही आता सवाल केले जात आहेत.

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट