इस्लामाबाद: पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून(pakistan election commission) गुरूवारी निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. जानेवारी २०२४च्या अखेरच्या आठवड्यात पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या विधानानुसार ५४ दिवसांच्या निवडणूक प्रचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होतील. याआधी एक दिवस आधी ईसीपीने घोषणा केली होती की त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहितेवर चर्चेसाठी पुढील महिन्यात राजकीय पक्षांसोहत एक बैठक ठरवली आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदारसंघांच्या सीमांकनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच मतदारसंघांच्या सीमांकनासाठी प्राथमिक यादी २७ सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाईल. त्यासोबतच याबाबतच्या हरकी आणि सूचना ऐकल्यानंतर शेवटची यादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.
पाकिस्तान संविधानानुसार ९० दिवसांच्या आत देशात सार्वत्रिक निवडणूक करण्यासाठी निवडणूक आयोग बांधील आहे. दरम्यान,पाकिस्तान संविधानानुसार ९० दिवसांच्या आत देशात सार्वत्रिक निवडणूक करण्यासाठी निवडणूक आयोग बांधील आहे. राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधी हे कोणत्याही प्रकारे पाकिस्तानची विचाधारा, पाकिस्तानचे सार्वभौमत्व, अखंडता तसेच सुरक्षा, नैतिकता तसेच सार्वजनिक व्यवस्था, अखंडता याला कोणत्याही प्रकारे ठोस पोहोचेल अशी कृती करणार नाहीत. असे आचारसंहितेमध्ये नमूद करण्यात आले आहे.