Sunday, June 15, 2025

लाच नको, लाज बाळगा

लाच नको, लाज बाळगा

 श्री गणेश भक्तांनी शर्मिष्ठा वालावलकरांना दिले मानाचे स्थान


लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची प्रतिमा आणि त्यावर लाच नको.. लाज बाळगा... अशा प्रकारच्या बॅनरचा गणेशाच्या सजावटी मध्ये समावेश करण्यात आला आहे. गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना जनजागृती व्हावी हा उद्देश यामागे असल्याचे एका गणेश भक्तांने सांगितले. प्रत्येक वर्षी सामाजिक संदेश असलेले सजावटी बघून नागरिकांकडून तसेच आरती निमित्त घरी येणाऱ्या नेते मंडळी व सामाजिक सेवकांकडून कौतुक होत असते.


समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. यामुळे प्रत्येक सणाला मुद्राय फाउंडेशन तर्फे समाजसेवेचे कार्य करण्यात येते. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवानिमित्त देवरे पाटील परिवारातर्फे घरगुती गणेशाच्या सजावटी मध्ये सामाजिक संदेश असलेल्या सजावटीला प्राधान्य देण्यात येते. मतदान जनजागृती, सार्वजनिक शौचालय निर्मिती, वही पेन दान उपक्रम घेऊन घरगुती गणेश उत्सवात सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. यावर्षी देखील सामाजिक उपक्रम हातात घेऊन नाशिक शहरात राजरोस पणे होणारा भ्रष्टाचार आणि भाईगिरी पूर्णपणे नष्ट होण्यासाठी जनजागृती सजावट करण्यात आली आहे.


घरगुती गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या सामाजिक संदेशामुळे समाज व्यवस्थेत थोडी जरी सुधारणा झाली. तरी गणेशोत्सव मनापासून साजरा झाल्याचे समाधान मिळते. या उपक्रमात मुद्राय युवा फाउंडेशन सहकार्य म्हणून कार्य करते. गणपती बाप्पा घरात साजरा होवो किंवा सार्वजनिक मंडळात साजरा होवो. त्यामध्ये सजावटीला महत्व न देता. त्या उत्सवात सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. तर त्या सणाला अधिक महत्व प्राप्त होते. मूर्ती पेक्षा कीर्ती महान या म्हणीला महत्व प्राप्त होते. असे मत मुद्राय च्या सदस्यांनी व्यक्त केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा