Friday, July 19, 2024
Homeक्रीडाcricketer wedding: ७ महिन्यांत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला हा क्रिकेटर, पाहा कोण आहे...

cricketer wedding: ७ महिन्यांत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला हा क्रिकेटर, पाहा कोण आहे तो…

मुंबई: पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने(shaheen shah afridi) १९ सप्टेंबरला शाहीद आफ्रिदीची मुलगी अंशा हिच्याशी दुसऱ्यांदा लग्न(marriage) केले. या दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही उपस्थित होता.

पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या लग्नात पाकिस्तानचे सध्याचे आणि माजी खेळाडू उपस्थित होते. शाहीन शाह आफ्रिदीच्या लग्नात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही उपस्थित होता. या सोबतच दोन्ही खेळाडूंमध्ये असलेल्या तणावाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शाहीनने याआधी यावर्षी फेब्रुवारीमध्ये अंशासोबत लग्न केले होते. मात्र यावेळी केवळ दोनच कुटुंबातील जवळचे लोक यात सामील होऊ शकले होते. मात्र आता त्यांच्या या लग्नात अनेक लोकांनी हजेरी लावली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या लग्नात सहभागी होत शाहीनची गळाभेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळेस माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीही तेथे उपस्थित होता.

Image

बाबर याआधी मेहंदी सोहळ्यातही आला होता. आशिया चषकाआधीच शाहीनच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा झाली होती. पाकिस्तानचा संघ वनडे वर्ल्डकपमध्ये भाग घेण्यासाठी पुढील आठवड्यात भारतासाठी रवाना होऊ शकतो. आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाच्या खराब कामगिरीनंतर शाहीनला वर्ल्डकपसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -