Tuesday, July 1, 2025

मोदींनी केला नारीशक्तीचा सन्मान!

मोदींनी केला नारीशक्तीचा सन्मान!
महिला सक्षमीकरण इतरांसाठी राजकीय मुद्दा, पण हा आमच्यासाठी मान्यतेचा मुद्दा - अमित शाह

नवी दिल्ली : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महिला आरक्षणावर आज संसदेत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट केली. महिला सक्षमीकरण इतरांसाठी राजकीय मुद्दा, पण हा आमच्यासाठी मान्यतेचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मोदींनी नारीशक्तीचा सन्मान केल्याचे शाह यावेळी म्हणाले.


केंद्रीय गृहमंत्री शाह महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. यावेळी शाह यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर पलटवार करत, घाबरू नका, घाबरू नका, असे म्हणाले.


आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले की, भारत सरकारच्या ९० सचिवांपैकी केवळ ३ ओबीसींचे आहेत. राहुल गांधी म्हणाले, घाबरू नका, आम्ही जात जनगणनेबद्दल बोलत आहोत. अमित शाह म्हणाले की, हे विधेयक युग बदलणार आहे. या विधेयकासाठी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. काही पक्षांसाठी महिला आरक्षण हा राजकीय मुद्दा असू शकतो, निवडणुका जिंकण्यासाठी ते शस्त्र असू शकते, परंतु माझ्या पक्षासाठी आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही.





तत्पूर्वी, महिला आरक्षण विधेयकावर बोलताना सोनिया गांधी यांनी महिला विधेयकामध्ये आरक्षणाची मागणी केली. अमित शाह यांनी चर्चेत सहभाग घेतल्यानंतर एससी तसेच एसटी वर्गासाठी आरक्षण असल्याचे सांगितले.


महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत भाग घेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ असल्याचे सांगितले. पंचायतींमध्ये महिला आरक्षण हे एक मोठे पाऊल होते. या विधेयकात ओबीसी आरक्षणाची तरतूद असावी, असे ते म्हणाले. महिला आरक्षण विधेयकात ओबीसी आरक्षण नाही. ओबीसी महिलांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. हे विधेयक अपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment