मराठा समाज पुन्हा आक्रमक, खुल्या प्रवर्गात एकही जागा नसल्याचा तीव्र निषेध...

येवला प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन, खुल्या वर्गाला जागा देण्याची मागणी


येवला उपविभागीय कार्यालयाने पोलीस पाटील भरती संदर्भात परिपत्रक जाहीर केले. यामध्ये तब्बल ६१ जागा असून या सर्वच्या सर्व जागा अनुसूचित जाती- जमाती व राखीव वर्गासाठी आहेत. एकूण २१७ मंजूर पदांपैकी १६१ पदे कार्यरत असून त्यापैकी ५६ रिक्त पदे आहेत. ५ पदे संभाव्य रिक्त होणारी आहेत. असे मिळून ६१ रिक्त पदे भरण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नसल्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागेसाठी इच्छुक असणाऱ्यांची मोठीच निराशा झाली आहे. हीच बाब येथील युवा नेते पांडुरंग शेळके पाटील,अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने खुल्या प्रवर्गात एकही जागा नसल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.


येथील उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांना जाब विचारण्यासाठी येथील प्रांत कार्यालय गाठले व तालुक्यातील पोलीस पाटील भरतीबाबत विचारणा केली. यावेळी खुल्या वर्गासाठी जागा सोडा, अन्यथा भरती बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. येथील प्रांत अधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बोलावून भरती प्रक्रियेतील बाजू समजून सांगितली. ते म्हणाले, सध्या आपल्या प्रांत विभागात खुल्या वर्गासाठी एकही जागा देता येत नाही. या सर्व जागा आरक्षणावरती ठरलेल्या असतात. खुल्या वर्गासाठी १०४ जागा आरक्षित असून त्यापैकी काही जागा या आधीच्या भरती प्रक्रियेत भरल्या गेलेल्या आहेत. तसेच खुल्या वर्गासाठी पुढील भरतीमध्ये जागा असतील. पोलीस भरती प्रक्रियेच्या जागा भरणे हा विषय आमच्या विभागाशी संबंधित नसल्यामुळे भरती प्रक्रिया सुरळीतपणे व पारदर्शकपणे होणार आहे. त्यासाठी आपण सहकार्य करावे असे प्रांत यांनी सांगितले. परंतु या उत्तराने कार्यकर्त्यांचे समाधान झाले नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच येणाऱ्या काळात पोलीस पाटील भरतीमध्ये या खुल्या वर्गासाठी जास्तीत जास्त जागा असाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


यावेळी तालुक्यातील युवा नेते पांडुरंग शेळके, नंदू आबा सोमासे, प्रवीण आहेर, भाऊसाहेब गाडे, श्रावण देवरे, आबा आहेर, माधव आहेर, बाजीराव चव्हाण, चांगदेव गाडे, गौनाथ सोमासे, गणेश सोमासे, राखमा दाणे यांच्यासह अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर