India vs Australia: कांगारुंविरोधात भारताची अग्निपरीक्षा, या खेळाडूंवर नजर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने(team india) आशिया चषक २०२३मध्ये दमदार कामगिरी केली आणि खिताबावर आपले नाव कोरले. आता भारतीय संघ मायदेशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टक्कर देणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे.


या संघात एक मोठा फेरबदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर होणाऱ्या वर्ल्डकपसाठी आधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. यात स्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान मिळाले नव्हते.


मात्र आशिया चषकादरम्यान अक्षऱ पटेल दुखापतग्रस्त झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी अश्विन आणि सुंदरला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ दिवस ३ वनडे सामने खेळणार आहे. अशातच वर्ल्डकपमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी सुंदर आणि अश्विनकडे चांगली संधी आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने दोन्ही संघांची घोषणा केली आहे. सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये के एल राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांना आराम देण्यात आला आहे. मात्र तिसऱ्या वनडेत या सर्वांचे पुनरागमन होणार आहे.



अक्षऱला सिद्ध करावा लागेल फिटनेस


आपला फिटनेस सिद्ध केल्यानंतरच अक्षऱला तिसऱ्या वनडेत संधी मिळेल. तर अश्विन आणि सुंदरला तीनही सामन्यात ठेवण्यात आले आहे. अशातच अक्षऱसाठी ही धोक्याची घंटा आहे तर सुंदर आणि अश्विनकडे वर्ल्डकप संघात आपले स्थान बळकट करण्याची चांगली संधी आहे.


बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी आधीच संघाची घोषणा केली आहे. मात्र आयसीसीनुसार वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या सर्व १० देशांकडे २८ सप्टेंबरपर्यंत संघात बदल करण्याची संधी आहे.



ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ


पहिल्या २ सामन्यांसाठी संघ - केएल राहुल (कप्तान, विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकप्तान), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर),शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.


तिसऱ्या सामन्यासाठी संघ - रोहित शर्मा (कप्तान), हार्दिक पंड्या (उपकप्तान), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल (चोट से ठीक होने पर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.



भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक


पहिली वनडे - २२ सप्टेंबर मोहाली
दुसरी वनडे - २४ सप्टेंबर इंदूर
तिसरी वनडे - २७ सप्टेंबर राजकोट

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून