Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीCanada India dispute: राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणात सरकारला एकटे सोडणार नाही, काँग्रेसने दिली...

Canada India dispute: राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणात सरकारला एकटे सोडणार नाही, काँग्रेसने दिली साथ

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो(canada pm justin trudeau) यांच्याकडून खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवल्याच्या प्रकरणात केंद्र सरकारला(central government) काँग्रेसची(congress) साथ मिळाली आहे. काँग्रेसने सांगितले की आंतरराष्ट्रीय प्रकरणात देश सर्वात आधी असेले आणि या मुद्द्यावर केंद्राला काँग्रेसचे समर्थन आहे.

दहशतवादी निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतीय गुप्तचर विभागााचा हात असल्याचा आरोप लगावत कॅनडाने भारताच्या राजदूतांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर मंगळवारी लिहिले की देशावर जेव्हा जेव्हा दहशतवादाचा धोका येतो तेव्हा एकजूट कायम राखली गेली पाहिजे अशा मताचे काँग्रेस आहे. विशेष म्हणजे ज्या घटनेवरून भारताचे सार्वभौमत्व, एकता तसेच अखंडतेला धोका असेल त्याप्रकरणात काँग्रेस नेहमीच सरकारच्या बाजूने असेल.

अभिषेक मनू सिंघवी यांनी केले सवाल

काँग्रेसचे आणखी एक खासदार अभिषेक मनू सिंह सिंघवी यांनी कॅनडाचे पंतप्रधान यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले भारतासाठी जितके धोकादायक शत्रू आहेत तितकेच जस्टिन ट्रुडोही आहेत. सिंघवी यांनी ट्रुडो यांची तुलना धरतीवरील ओझे अशी केली आहे.

काय आहे वाद

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आरोप केला आहे की खलिस्तानी दहशतवाही हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणा रॉच्या एजंटचा हात आहे. त्यांचे हे आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. तसेच ट्रुडो हे निरर्थक आणि चिथावणीखोर विधान करत असल्याचे भारताने म्हटले आहे. कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलिना जेली यांनी घोषणा केली की एका वरिष्ठ भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नाव पवन कुमार राय आहे. ते रॉचे एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -