बॉलिवूड, टिव्ही मधील दिग्गज कलाकारांनी देखील वराह जयंतीनिमित्त दिल्या शुभेच्छा
मुंबई : हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून धर्माच्या रक्षणासाठी आणि मानव कल्याणासाठी पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करणा-या जगाचा रक्षक श्री हरि-विष्णूचा अवतार भगवान श्री वराह यांची जयंती (Varaha Jayanti) काल उत्साहात साजरी करण्यात आली. वराह जयंती निमित्त राज्यात विविध जिल्ह्यांतील तालुका, वस्ती, पादेत येथे मोठ्या उत्साह दिसून आला. तसेच जयंतीत महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
जयंतीनिमित्त मालेगाव सह, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे वराहची वाजत गाजत ढोलताशांचा गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठीकाणी होमहवन देखील करण्यात आले.
तसेच या वेळेस बॉलिवूड सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांनी देखील सोशल मीडिया च्या माध्यमाने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. महत्वाचे म्हणजे नाशिक परिक्षेत्रातील आयपीएस रेंज आय.जी श्री. बी. जी. शेखर, तसेच हूड हूड दबंग दबंग, चलाओ ना नैनो से बान रे, तेरे नैना मार ही डालेंगे अशा ५०० हून अधिक हिट गाणे आपल्या मधुर वाणीतून गायलेले सुप्रसिद्ध गाण्यांचे गायक शबाब सब्री, सूप्रसिद्ध संगीतकार नितेश श्रीवास्तव, १००० हून अधिक टेलिव्हिजन अॅड करणारे अभिनेता कांचन जी पगारे, तसेच प्रसिध्द संगीतकार, प्रोड्यूसर विकास कौशिक, टीव्ही अभिनेता स्टार प्लस, झी. टीव्ही मधील ससुराल सिमर का, किस्मत की लखिरो से, सिर्फ तुम मधील प्रसिद्ध कलाकार निर्भय सिंघ यांनी देखील वराह जयंतीच्या महाराष्ट्र वासियांना दिल्या शुभेच्छा. अशा अनेक टीव्ही सिरियल मराठी हिंदी बॉलिवूड मधील दिग्गज कलाकारांनी ह्यावेळी वराह जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
भगवान विष्णूच्या १० अवतारांपैकी भगवान वराहचा हा तिसरा अवतार आहे. वरुथिनी एकादशीच्या दिवशी परमेश्वराच्या वराह अवताराची पूजा केली जाते. यावेळी वरुथिनी एकादशी ३० एप्रिलला आहे. याला वरुथिनी ग्यारस असेही म्हणतात. वरुथिनी एकादशीच्या दिवशी वराहची पूजा करून त्यांच्या जन्माची कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होते. राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला होता. यावेळी संपूर्ण राज्यात वराह जयंती वेगळ्या स्वरूपात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली आणि राजकीय, अराजकीय व्यक्तींनी देखील सहभागी होऊन जयंती दिनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.