Sunday, September 14, 2025

Parliment : संसदेत सुप्रिया सुळेंनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, या दोन भाजप नेत्यांची काढली आठवण

Parliment : संसदेत सुप्रिया सुळेंनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, या दोन भाजप नेत्यांची काढली आठवण

नवी दिल्ली : संसदेच्या(parliment) विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीत झाले. उद्यापासून नव्या इमारतीत अधिवेशनाचे कामकाज सुरू राहणार आहे. अशातच जुन्या संसद इमारतीत कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणा संसदेच्या ७५ वर्षांच्या इतिहासाची आठवण काढली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या भाषणाचेही कौतुक झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, मी आज पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक करते. या देशाच्या निर्मितीमध्ये गेल्या ७ दशकांनी विभिन्न लोकांनी योगदान दिले आहे.

सुप्रिया सुळेंनी या दोन भाजप नेत्यांची काढली आठवण

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही याला इंडिया म्हणा किंवा भारत. हा आपला देश आहे.आपण सगळे येथे जन्मलो आहोत त्याबद्दल आपण धन्य आहोत. मी आज त्या दोन नेत्यांची नावे घेते ज्यांचा भाजपने उल्लेख केलेला नाही. त्यांच्या संसदीय कामकाजाने मी अतिशय प्रभावित झाले. मला असे वाटते की ते सगळ्यात मोठ्या नेत्यांपैकी एक होते आणि असाधारण खासदार होते याचा आम्ही आदर करतो. त्यापैकी एक म्हणजे सुषमा स्वराज आणि दुसरे अरूण जेटली.

संसदेत काय म्हणाले पंतप्रधान?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदनाला संबोधित करताना जुन्या इमारतीने मिळवलेल्या यशाबद्दल सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, नव्या संसद भवनात जाण्यासाठी त्यांचा प्रेरणादायी प्रवास, इतिहातील महत्त्वाच्या घडामोडींचे स्मरण करत पुढे जाण्याची ही संधी आहे. आपण सगळे या ऐतिहासिक संसद भवनातून जात आहोत. स्वातंत्र्याआधी हे सदन काऊंन्सिलचे स्थान होते. स्वातंत्र्यानंतर याला संसद भवन अशी ओळख मिळाली.
Comments
Add Comment