
२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : संसदेचे आजपासून विशेष सत्र बोलावण्यात आले आहेत. चंद्रयान-३ ची यशस्वी मोहीम आणि त्यानंतर भारताने जी-२० समिटचे यजमानपद भूषवत जागतिक नेत्यांचे भारतामध्ये केलेले आदरातिथ्य यानंतर वातावरण सकारात्मक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता मागील ७५ वर्ष आणि पुढे भारताचा होणारा प्रवास यासाठी संसदेचे हे विशेष सत्र महत्त्वाचे ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनामध्ये आता भविष्यातील अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, असे म्हणताना हे अधिवेशन लहान असले तरी महत्त्वाचे असल्याचाही उल्लेख मोदींनी केला आहे. यावेळी विरोधकांकडूनही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.