इंफाळ: अज्ञात व्यक्तींनी भारतीय लष्करातील एक जवान शिपाई सर्टो थांगथांग कोम यांचे अपहरण करत त्यांची हत्या केली. शिपाई थांगथांग हे सुट्टीवर होते त्यांचे तरूंग, नेइकानलोंग, हॅपी व्हॅली, इंफाळ पश्चिम येथून अपहरण करण्यात आले होते. त्यांना मणिपूरच्या लीमाखोंग मिलिट्री स्टेशनवर तैनात करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता केले अपहरण
१६ सप्टेंबर २०२३ला सकाळी १० वाजण्याच्या सुमाराह शिपाई सर्टो यांचे त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. त्यांचा १० वर्षांच्या मुलाने ही सर्व घटना पाहिली. मुलाने सांगितले की तीन व्यक्ती त्यांच्या घरात आल्या. त्यावेळेस वडील आणि मुलगा वऱ्हांड्यात काम करत होते. त्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर पिस्तुल ठेवली आणि त्यांना जबरदस्ती सफेद गाडीत बसवले आणि आपल्यासोबत घेऊन गेले.
डोक्यात गोळी मारून केली हत्या
१७ सप्टेंबरला सकाळी या जवानाची काहीच खबर मिळाली नाही. सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मृतदेह इंफाळ पूर्वच्या सोगोलमांग पोलीस ठाण्यांतर्गत मोंगजामच्या पूर्व खुनिंगथेक गावात आढळला. त्यांच्या बहीण-भावाने ओळख पटवली.