नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. स्वतंत्र भारतात जन्म घेणारे देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशाला भेटवस्तू दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्वेंशन आणि एक्सपो सेंटरचे उद्घाटन केले. तर आज पंतप्रधान विश्वकर्मा योजनाही(vishwakarma scheme) लाँच केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्वारकेत इंडिया इंटरनॅशनल कन्वेंशन अँड एक्सपो सेंटर म्हणजेच यशोभूमीच्या पहिल्या फेजचे उद्घाटन केले. या प्रोजेक्टचा खर्च ५४०० कोटी रूपये आहे. यासोबतच द्वारकामध्ये नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटनही केले.
नवे कन्वेंशन सेंटर इतके खास का?
यशोभूमी हे एक मोठे कन्वेंशन सेंटर आहे यात अनेक प्रदर्शनीय हॉल आणि दुसऱ्या सुविधा आहेत. कन्वेंळन सेंटरचा जागतिक स्तरावर प्लेनरी हॉल येणाऱ्या लोकांना जागतिक अनुभव देईल. या संपूर्ण सेंटरसाठी ५४०० कोटी रूपये इतका खर्च आहे. कन्वेंशन अंड एक्सपो सेंटरचा परिसर ८ लाख ९० हजार स्क्वे फीट क्षेत्रात पसरला आहे. येथे ११ हजाराहून अधिक प्रतिनिधींना बसण्याची सोय आहे. कन्वेंशन अँड एक्सपो सेंटरमध्ये १५ संमेलन कक्ष आहेत तर १३ बैठक कक्ष आहेत. तसेच सोबतच ग्रँड बॉलरूमचीही निर्मिती करण्यात आली आहे.
कामगारांना पंतप्रधान मोदींकडून गिफ्ट
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसासोबत विश्वकर्मा जयंतीही आहे. पंतप्रधानांनी पारंपारिक कारागीर, शिल्पकारांसाठी विश्वकर्मा योजना लाँच केली आहे. याची घोषणा खुद्द पंतप्रधानांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केली होती. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा उद्देश देशातील लाखो कामगार, शिल्पकारांना समृद्धीच्या रस्त्यावर घेऊन येणे आहे. यामुळे केवळ सांस्कृतिक वारसा समृद्ध राहण्याचा प्रयत्न केला जाणार नाही तर यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळेल.