Plane crash: ब्राझीलमध्ये विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू

  185

मनौस : ब्राझीलच्या उत्तर अॅमेझॉन राज्यात शनिवारी झालेल्या विमान अपघातात(plane crash) १४ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या गर्व्हनरनी सांगितले हा अपघात राज्याची राजधानी मनौस येथून साधारण ४०० किमीत दूर बार्सिलोस येथे झाला.


अमेजनस राज्याचे गर्व्हनर विल्सन लीमा म्हमाले, शनिवारी बार्सिलोस येथे झालेल्या विमान अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर चालक दलातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याप्रकऱणी दु:ख झाले आहे. आमची टीम सर्वतोपरी मदत करत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रती माझी सहानुभूती आणि प्रार्थना नेहमीच सोबत आहे.


रिपोर्टनुसार या विमानात १२ पर्यटक आणि एक पायलट तसेच एक को पायलट उपस्थित होते. ब्राझीलच्या नागरिक सुरक्षाने म्हटले की विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार हे विमान लँड होत असताना मुसळधार पाऊस असल्याने खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाला.


या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान यात काही अमेरिकन नागरिक सहभागी होते असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात