बाप्पाचे आगमन
भाद्रपद चतुर्थीला
गणरायाचे आगमण
ढोल-ताशे स्वागताला
मनी चैतन्याची उधळण…
शोभिवंत मखरात
बाप्पाचा किती थाट
प्रसाद मोदकांचा
आरतीला सजले ताट…
दहा दिवसांचा पाहुणा
आला आमच्या घरी
भक्तिमय वातावरणात
हात जोडूया सारी…
बाप्पाला शोभून दिसे
दुर्वा, फुलांची माळ
आरतीत मग्न होऊया
सकाळ-सायंकाळ…
सद्बुद्धी दे बाप्पा
दु:खाचा कर नायनाट
सुख-शांती लाभू दे
दाखव समृद्धीची वाट…
– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ