Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीमाजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट, बबन घोलप यांच्या...

माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट, बबन घोलप यांच्या भूमिकेवर लक्ष

नाशिकरोड (प्रतिनिधी) : देवळाली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप(former mla yogesh gholap) यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे वरवर सांगितले जात असले तरी भेटीत देवळाली मतदार संघाविषयी राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, दिनेश धात्रक, उमेश खातळे, मनोज पालखेडे आदी. पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे या भेटीला राजकीय दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.भविष्यात योगेश घोलप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडून देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवू शकतात.

राजकारणात हल्ली कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्याचे अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात महाष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. दरम्यान घोलप यांनी प्रवेश केल्यावर विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरू शकते. भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली. याविषयी गूढ असले तरी राजकीय चर्चा नक्की झाली असून लवकरच माजी आमदार योगेश घोलप हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भविष्यात देवळाली विधानसभा मतदान संघात योगेश घोलप आणि सरोज आहिरे अशी राजकीय लढाई मतदारांना पहायला मिळू शकते. राष्ट्रवादीचे युवक जिल्हा प्रमुख गणेश गायधनी यांनी ही भेट घडवून आणल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

“शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे.देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर मोठ्या संख्येने पदाधिकारी शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहे. शरद पवार यांनी मला देवळाली मतदारसंघातील काही प्रश्न विचारले, त्याचे उत्तरे मी सकारात्मक उत्तरे दिली. राजकीय दृष्टीने भविष्यात काय होईल हे आत्ता सांगू शकत नाही .पण माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करायचा की नाही याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.” अशी प्रतिक्रिया यावेळी माजी आमदार योगेश घोलप यांनी दिली.

माजी मंत्री बबनराव घोलपही नाराज

मागील काही दिवसापासून शिवसेना उद्धव ठाकरे आणि घोलप कुटुंबीयांमध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघा विषयी राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत माजी मंत्री बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी मातोश्रीने नकार दिल्याने घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. मात्र तुम्हाला चर्चेसाठी दोन दिवसात मातोश्रीवर बोलवले जाईल, उद्धव ठाकरे यांच्यासोबत समक्ष चर्चा करून देतो, असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी घोलप यांना दिले होते. पण दोन दिवस उलटून गेल्यावर देखील घोलप वेटिंगवरच असल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -