Friday, November 8, 2024
Homeक्रीडाAsia cup 2023: आशिया चषक उंचावण्यासाठी आज भारत-श्रीलंका आमनेसामने

Asia cup 2023: आशिया चषक उंचावण्यासाठी आज भारत-श्रीलंका आमनेसामने

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) फायनल सामना अवघ्या काही तासांत सुरू होमार आहे. यावेळी आशिया चषकाचा फायनल सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघादरम्यान आज दुपारी तीन वाजल्यापासून सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे तर दासुन शनाका श्रीलंकेचे नेतृ्त्व करणार आहे.

भारताचा पाच वर्षांचा दुष्काळ संपणार?

आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात २० सामने खेळवले गेले ज्यात भारताने १० सामने जिंकले तर श्रीलंकेला १० सामने जिंकता आले. टीम इंडियाने आतापर्यंत ७ आशिया चषक जिंकले आहेत आणि ५ वेळा फायनलमध्ये त्यांनी श्रीलंकेला हरवले आहे. तर ३ वेळा फायनलमध्ये श्रीलंकेने भारताला हरवले. यावेळेस फायनलमध्ये भारताला विजयाचे दावेदार मानले जात आहे. भारताने गेल्या ५ वर्षांत कोणतीही आंतराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली नाही.

फायनल सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्पिन ऑलराऊंडर अक्षर पटेल दुखापतीमुळे फायनल सामन्यात खेळू शकणार नाही. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला स्क्वॉडमध्ये सामील करण्यात आले आहे. सुंदर टीमसोबत आहे.

या खेळाडूंचे प्लेईंग ११ मध्ये पुनरागमन

फायनल सामन्याआधी भारतीय संघाच्या प्लेईंग ११मध्ये मोठे बदल होत आहेत. भारताने बांगलादेशविरुद्धच्या शुक्रवारी झालेल्या सुपर ४ सामन्यात आपल्या पाच मुख्य खेळाडूंना आराम दिला होता. आता फायनल सामन्याआधी विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन निश्चित आहे.

आशिया चषक स्पर्धा ही पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वर्ल्डकपची पूर्वतयारी मानली जात आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी हा खिताब जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -