Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीजनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे; शेतकरी चिंताग्रस्त

जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे; शेतकरी चिंताग्रस्त

डहाणू : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जनावरे व रस्त्यांवर फिरणाऱ्या काही मोकाट जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ९९ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याने लम्पी रोगाची कोणतीही साथ नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचा दावा फेल ठरला असल्याचे डहाणूत दिसून येत आहे.

डहाणू आशागड परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जनावरांना व मोकाट जनावरांना लम्पी रोगाची लक्षणे दिसत असल्याची तक्रार विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते व गौरक्षक व काही शेतकरी यांनी डहाणू पंचायत समिती कार्यालयाकडे केली आहे. या लम्पी रोगामुळे शेतकरी आणि दुग्ध उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. लम्पी रोगामध्ये जनावरांच्या शरीरावर पुरळ आणि फोड येऊन जखमा होणे, पाय आणि सडांना सूज येऊन अशक्तपणाने जनावरे गळून पडणे इत्यादी लक्षणे दिसून आले.

लम्पी रोगाच्या उपचारासाठी व प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून पाहणी, तपासणी, कार्यशिबिरे, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, परंतु ते फेल ठरत असल्याचे ग्रामीण भागात पाहण्यास मिळाले.

आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुका क्षेत्रामध्ये २ लाख ३७ हजार २२ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरून या रोगाच्या प्रतिबंधक उपचारासाठी आवश्यक लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ९९% जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व मोकाट जनावरांना अजूनही लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यामुळे रस्त्यांवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फिरणाऱ्या या मोकाट जनावरांना मोठ्या प्रमाणावर लम्पीची लागण झाली असून, याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने पशुपालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार २२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, मात्र असे असले तरी जनावरांचे लसीकरण करताना अडचणी येत असल्याचे सांगत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले हात झटकले आहेत, असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -