Crime : सोने लपविण्यासाठी चक्क डायपरचा वापर!

Share
  • गोलमाल : महेश पांचाळ

आजकाल गुन्ह्यांच्या नवनव्या पद्धती समोर येताना दिसतात. मात्र एखादा गुन्हेगार किंवा आरोपी गुन्हा करतानाच अशी एखादी किरकोळ चूक करून बसतो की, त्याला पकडण्यासाठीचा किंवा गुन्ह्याची उकल करणारा दुवा तिथेच सोडतो. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होते. मुंबईतून अशाच स्वरूपाचा एका गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळला गेला. सिंगापूरहून मुंबईत उतरणाऱ्या भारतीय प्रवाशांकडून कोट्यवधींच्या किमतीचे सोने नव्हे तर सोन्याची पावडर जप्त करण्यात आली. सोन्याची पावडर लपवण्यासाठी या प्रवाशांनी केलेली क्लृप्ती समोर आली तेव्हा अधिकारीही हैराण झाले. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. सिंगापूरहून परत येणाऱ्या भारतीय कुटुंबाला विमानतळावर अडवले आणि त्यांच्याकडून सोन्याची पावडर जप्त केली. त्यांनी ती पावडर कुठे लपवली होती माहीत आहे का तुम्हाला?. सोन्याची पावडर लपवण्यासाठी या प्रवाशांनी त्यांच्यासोबत असलेल्या बाळाच्या डायपरचा वापर केला. चक्क डायपरमध्ये सोन्याची पावडर लपवून ते विमानातून प्रवास करत होते. बाळाच्या डायपरमध्ये काही लपविले आहे का? याचा संशय कस्टम अधिकाऱ्यांना आला. त्यांनी त्या प्रवाशांची अंतर्वस्त्रे आणि तीन वर्षांच्या लहान मुलाच्या डायपरची स्कॅनमधून तपासणी केली. त्यावेळी त्यात संशयास्पद वस्तू असल्याचे जाणवले. या डायपरमध्ये चक्क सोन्याची पावडर लपवून आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो फसला. या प्रवाशांकडून मुंबई विमानतळावरील कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ कॅरेट सोन्याची पावडर जप्त केली. त्याची किंमत सुमारे १.०५ कोटी रुपये इतकी आहे.

पुण्यातही तस्करी करणाऱ्याला झाली होती अटक…
यापूर्वीही परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्यातून दुसऱ्या देशातून आपल्या देशात सोन्याची तसेच ड्रग्जची तस्करी करणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातही अशी घटना उघडकीस आली होती. पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. हा आरोपी दुबई येथून आला होता. तो अवैधरीत्या सोन्याची तस्करी करत होता. त्याने कॅप्सूलमध्ये लपवून सुमारे २२ लाख रुपयांचे सोने आणले होते. अलीकडच्या काळात पोलिसांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी सुरू होती. विशेष म्हणजे नामांकित एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचादेखील यात समावेश होता. आरोपी हे दुबई ते मुंबई अशा हवाई मार्गाने सोन्याची तस्करी करत होते. दुबईवरून सोने घेऊन निघालेला तस्कर मुंबई विमानतळावर उतरताच सोने विमानातील सीटवरच सोडून जात असे. त्यानंतर विमान कंपनीच्या मदतीने सोने विमानतळाबाहेर काढले जायचे. मात्र, या पद्धतीने सोने भारतात आणणाऱ्या सर्व प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

maheshom108@gmail. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

32 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

36 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

1 hour ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago