
बंगळुरू: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेल्यये इस्त्रोचे पहिले यान आदित्य एल१ची(aditya l1) अर्थ ऑर्बिट चौथ्यांदा वाढवण्याचे काम शुक्रवारी यशस्वीपणे पूर्ण केले. अंतराळ यानाने आपल्या पोस्टमध्ये याची माहिती दिली.
मॉरिशस, बंगळुरू, एसडीएससी-एसएचएआर आणि पोर्ट ब्लेअर मध्ये इस्त्रोच्या ग्राऊंड स्टेशनने या ऑपरेशनदरम्यान आदित्य एल१ला ट्रॅक केले. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात पाच लँग्रेंज पॉईंट आहेत. लँग्रेज पॉईंट याला म्हटले जाते जिथे सूर्याला कोणत्याही ग्रहणाशिवाय पाहिले जाऊ शकते. आदित्य एल १ हे यान लँग्रेज पॉईंट १ वर पाठवले जात आहे. पृथ्वीपासून लँग्रेज पॉईंट १ हा १५ लाख किमी दूर आहे. तर सूर्यापासून पृथ्वीचे उंतर १५ कोटी किमी इतके आहे.
Aditya-L1 Mission:
The second Earth-bound maneuvre (EBN#2) is performed successfully from ISTRAC, Bengaluru.
ISTRAC/ISRO's ground stations at Mauritius, Bengaluru and Port Blair tracked the satellite during this operation.
The new orbit attained is 282 km x 40225 km.
The next… pic.twitter.com/GFdqlbNmWg
— ISRO (@isro) September 4, 2023
लँग्रेज पॉईंटवर पोहोचण्यास लागणार ११० दिवस
आदित्य एल १ यानाने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अर्थ बाऊंड मॅन्यूवरला ३,५ आणि १० सप्टेंबरला यशस्वीपणे पूर्ण केले. इस्त्रोचे हे यान पृथ्वीच्या चारही बाजूला १६ दिवस चक्कर लावणार आहे. यादरम्यान तो पुढील प्रवासासाठी अपेक्षित वेग साध्य करणार आहे. पाचवा अर्थ बाऊंड मॅन्यूवर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आदित्य एल १ लँग्रेस पॉईंटपर्यंत जाण्यासाठी ११० दिवसांच्या प्रवासासाठी रवाना होणार आहे.