Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Mahadev Online Gaming App : टायगर श्रॉफ, सनी लिओनी, नेहा कक्करसह १४ बॉलीवूडकर लग्नाला गेले आणि पस्तावले!

Mahadev Online Gaming App : टायगर श्रॉफ, सनी लिओनी, नेहा कक्करसह १४ बॉलीवूडकर लग्नाला गेले आणि पस्तावले!

विदेशातील मोठ्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींनी लावली होती उपस्थिती

मुंबई : 'महादेव ऑनलाइन गेमिंग ॲप'च्या (Mahadev Online Gaming App) कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी टाकली आहे. या छापेमारीमध्ये ४१७ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. यात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफ (Tiger Shroff), सनी लिओनी (Sunny Leone), नेहा कक्करसह (Neha Kakkar) जवळजवळ १४ बॉलीवूडकर ईडीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यत ईडीनं तब्बल ३९ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात एकूण ४१७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या रोख देवाण-घेवाणीची चौकशी होणार आहे. यात नुसरत भरुचाचेही (Nusrat Bharucha) नाव घेतले जात आहे. बॉलीवूडमधील विशाल दादलानी (Vishal Dadlani), कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) यांचाही यात समावेश आहे. शिवाय यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

विदेशातील मोठ्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींनी लावली होती उपस्थिती

महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपमध्ये मनी लाँड्रिंगसंदर्भात एका भव्य लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या (Saurabh Chandrakar) लग्नसोहळ्यातील आहे. मुख्य आरोपी हा ॲपच्या संस्थापकांपैकी एक आहे. या विदेशातील मोठ्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. त्यांना एका प्रायव्हेट प्लेनमधून त्या लग्नासाठी नेण्यात आले होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे. लग्नाचा खर्च ईडीच्या स्कॅनरखाली असून गेमिंग ॲपवरुन बेकायदेशीर रोख रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार आता ईडीकडून कारवाई सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment