
नवी दिल्ली : गहूचे दर सातत्याने वाढत आहे. विधानसभा निवडणुकीआधी गव्हाच्या किंमतीमध्ये उसळी आल्यानंतर सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. किंमतीमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने गव्हाची स्टॉक लिमिट ३ हजाराहून घटवून २ हजार टन करण्याची घोषणा केली आहे. सरकारचा हा निर्णय तातडीने लागू होणार आहे.
या निर्णयाची घोषणा करताना खाद्य सचिव संजीव चोपडा म्हणाले, सध्याचे वाढते दर पाहता आम्ही स्टॉकचे समीक्षण केले आणि आज १४ सप्टेंबर २०२३ पासून व्यापारी, घाऊक विक्रेता आणि मोठ्या चेन रिटेलर्ससाठी स्टॉक लिमिटची सीमा घटवून २ हजार टन केली आहे. याआधी १२ जून २०२३ला सरकारने गहू व्यापाऱ्यांना मार्च २०२४ पर्यंत ३ हजार टन गहू स्टॉक करण्याची परवानगी दिली होती. ती आता घटवून २ हजार टन केली आहे.
गेल्या एका महिन्यात वायदा बाजारात गहूच्या किंमतीमध्ये चार टक्के उसळी पाहायला मिळाली. गव्हाचे दर वाढू २५५० रूपये प्रति क्विंटल झाले आहे. खाद्य सचिव म्हणाले देशांत गव्हची पुरेशी उपलब्धता आहे मात्र असे वाटत आहे की काही लोक आर्टिफिशियल पद्धतीने गव्हाची कमतरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.