Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात

  271

मनोज जरांगे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक


जालना : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत अखेर सतराव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दोन सरकारी अधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.


मनोज जरांगे यांनी भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे की आपल्या समाजाच्या पदरात आरक्षण टाकूनच घरी जाईन तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. आमचं उपोषण सोडण्याकरता ते स्वतः वेळ काढून इथे आले त्याबद्दल त्यांचे स्वागत आणि आभार, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या.


महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्याकडून खूप आशा आहेत, आणि त्यांना असं वाटतं की या राज्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त एकनाथ शिंदे साहेबांतच आहे. मीदेखील अख्ख्या समाजासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आरक्षण मिळवणार आहे. मुख्यमंत्र्यांना एक महिन्याचा वेळ देण्याचा निर्णयदेखील सर्वानुमते घेण्यात आला आहे. समाजाकडून एकमताने सांगण्यात आलं, तेव्हा मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे देखील मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.


जरांगे पाटील पुढे म्हणाले, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार यावर मी ठाम आहे. मला चिठ्ठी देण्यात आली. त्याची लोकांमध्ये चर्चा झाली. पण मी तसले धंदे करत नाही, मी तशी औलाद नाही. मी मराठा समाजासोबत पारदर्शक आहे, मी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही. तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका. आमची आरक्षणाशिवाय काही मागणी नाही, वेळ घ्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना देखील हलू देणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी