
कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) गुरूवारी १४ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भिडतील. दोन्ही संघाचा सुपर ४मधील शेवटचा सामना आहे. मात्र हा सामना कोणत्याही सेमीफायनलपेक्षा कमी नाही. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनीही सुपर ४मध्ये दोन-दोन सामने खेळले आहेत. या दरम्यान दोन्ही संघांना प्रत्येकी एक विजय मिळाला आहे आणि प्रत्येकी एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अशातच सामना जिंकणारा संघ ४ पॉईंटसह फायनलमध्ये जाईल.
पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर...
या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. अशातच सवाल हा आहे की जर पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल. याचे उत्तर आहे श्रीलंका. जर पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका सामना रद्द झाला तर दसुन शनाकाचा संघ फायनलमध्ये प्रवेश घेईल. श्रीलंकेचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. अशातच सामना रद्द होण्याच्या स्थितीत श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये पोहोचेल.
या सामन्यासाठी रिझर्व्ह डे नाही
पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवलेला नाही. अशातच फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचा खुलासा गुरूवारी होईल. पावसामुळे सामना रद्द झाला तर १७ सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगेल.