
मुंबई: मुंबई एअरपोर्टवर (Mumbai airport) गुरूवारी चार्टर प्लेनला(charter plane) झालेल्या अपघातात २ जण जखमी झाले आहे. यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एअरपोर्टच्या रनवे २७वर झाला आहे. प्राथमिक तपासणीदरम्यान ओव्हर शूट असल्याचे समोर आले आहे. यात कोणीही व्हीआयपी प्रवास करत नव्हते. दरम्यान, अपघाताच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
डीजीसीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे की खराब हवामानामुळे हा अपघात झाला. या अपघातामुळे एअरपोर्टवर लँडिंग आणि टेकऑफ थांबवण्यात आले आहेत. या खाजगी विमानात २ क्रू मेंबरसोबत ६ प्रवासी प्रवास करत होते. ही घटना गुरूवारी संध्याकाळी घडली. यात खासगी विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.
#WATCH | VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL operating flight from Visakhapatnam to Mumbai was involved in runway excursion (veer off) while landing on runway 27 at Mumbai airport. There were 6 passengers and 2 crew members on board. Visibility was 700m with heavy rain. No… pic.twitter.com/KxwNZrcmO5
— ANI (@ANI) September 14, 2023
सूत्रांच्या माहितीनुसार हे खासगी विमान विशाखापट्टणम येथून मुंबईत पोहोचले होते त्याच वेळेस हा अपघात झाला. यात जखमी झालेल्या दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे व्हीएसआर वेंचर्स लिअरजेट ४५ विमान सांगितले गेले आहे. एएनआयच्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे दृश्यता ७०० मीटर होती.