Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीकोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड पोलीस सज्ज, ४०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात

कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड पोलीस सज्ज, ४०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात

पेण(देवा पेरवी) – मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोरात सुरू असून या महामार्गावरून यंदाचा गणेशोत्सव हा शेवटचा खडतर होणार असून पुढील वर्षी मात्र सुखाने प्रवास होणार असल्याचे मत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिसांना मार्गदर्शन करताना सांगितले. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड पोलीस सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखावी तसेच मुंबई गोवा व खोपोली मार्गावर वाहतूकोंडी होऊ नये तसेच कोकणाकडे येणाऱ्या चाकरमानी व प्रवाशी यांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. रायगड पोलीसांच्या वतीने सर्व तालुक्यातील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, वाहतूक पोलिस यांची मार्गदर्शन मीटिंग वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोलवी येथे घेऊन उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी तिन दिवस गणेशोत्सव काळात महामार्गावर ४०० हुन अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताला असणार आहेत. रस्त्यावर असताना मोबाईल चा वापर कमी करा, पुढील वर्षी महामार्ग पूर्ण झाल्यावर फक्त ५० ते १०० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त करतील. तर गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी १० सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले असून, जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलीस व वाहतूक पोलीस यांना जॅकेट, रिफ्लेक्टर, बॅरिकेट, आधुनिक मॅपद्वारे दिशा दर्शक तक्ते तसेच आदी सुरक्षतेची साधने देऊन रायगड पोलीस गणेश भक्तांच्या सुखकर प्रवासाठी सज्ज झाले असल्याचे यावेळी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी बंदोबस्त करताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेतेची देखील काळजी घेण्याचे आवाहन यावेळी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.

तर यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोकणात जाताना रायगड जिल्ह्यातून १५१ किलोमीटरचा महामार्ग लागतो, पोलिसांनी नेहमी कोकणवासींयांशी चांगलं बोला, चांगलं वागा, आपलं स्वतःच वर्तन चांगलं ठेवा, चांगल्या खेळपट्टीवर सगळेच खेळाडू खेळतात, मात्र आपल्याला खराब खेळपट्टीवर चांगलं खेळायचं आहे, महामार्गावरील पोलिसांनी जास्त बोलण्यापेक्षा शिट्टीचा वापर जास्त करा, यावेळी रस्त्यावर तंदुरुस्त पोलिसांचा वापर जास्त केला आहे, सर्वांनी स्वतःचा आरोग्य सांभाळा, स्वतःची व सहकाऱ्यांची काळजी घ्या.
यावेळी मार्गदशन मीटिंग वेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक सोमनाथ , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पेण डी.वाय.एस.पी शिवाजी फडतरे, अलिबाग डी.वाय.एस.पी. अरुण भोर, कर्जत डी.वाय.एस.पी. विजय लगारे, रोहा.डी.वाय.एस.पी. सोनाली कदम, खालापूर डी.वाय.एस.पी विक्रम कदम, डी.वाय.एस.पी. संजय सावंत, वडखळ पी.आय. तानाजी नारनवर, पेण पी.आय. देवेंद्र पोळ, दादर पी.आय. अजित गोळे, खोपोली शीतलकुमार राऊत, खालापूर पी.आय. बाळा कुंभार, पोयनाड पीआय. देवेंद्र बेलदार, नागोठणे पी.आय संदीप पोमन तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -